मानवी शरीराशी संबंधित पाच रहस्यमय गोष्टी

मानवी शरीराशी संबंधित काही गोष्टी आपल्याला आश्चर्यात टाकतात, किंवा विचार करण्यास भाग पाडतात. जाणून घ्या अशाच मानवी शरीराशी संबंधित पाच गोष्टी.

Updated: Dec 3, 2015, 05:55 PM IST
मानवी शरीराशी संबंधित पाच रहस्यमय गोष्टी title=

मुंबई : मानवी शरीराशी संबंधित काही गोष्टी आपल्याला आश्चर्यात टाकतात, किंवा विचार करण्यास भाग पाडतात. जाणून घ्या अशाच मानवी शरीराशी संबंधित पाच गोष्टी.

१) लठ्ठ व्यक्तींमध्ये अन्नपचवण्याची क्रिया मंद असते का?
लठ्ठ व्यक्तींमध्ये चयापचायची क्रिया मंद गतीने होत नाही. चयापचय म्हणजेच पोटातील अन्न पचण्याची क्रिया, लठ्ठ लोकांमध्ये अन्न पचण्याची क्रिया मंद असू शकते असं म्हटलं जातं, मात्र वजनदार लोकांच्या शरीरयष्टीच्या मानाने जास्त उर्जा खर्च होते. म्हणून त्यांच्यातील पचनाची क्रिया मंदावत नाही.

२) शरीराच्या कोणत्या भागाचं वजन वाढणे जास्त घातक?
शरीरातील कोणत्याही भागाचं वजन जास्त असेल, तर ते नुकसानकारकच असतं, पोट, मांड्या, कमरेचा भाग लठ्ठ असला तरी ते शरीरासाठी घातकच असतं. सुरूवातीला म्हटलं जात होतं की, पोटाचं वजन जास्त असलेल्या लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त असतो, पण सर्वच प्रकारची लोकं ज्यांचं वजन कुठेना कुठे जास्त आहे, त्यांना धोका असतोच.

३) जास्तच जास्त महिलांच्या शरीराचा आकार कसा असतो?
जास्तच जास्त महिलांच्या शरीराराचा आकार, आयताकार असतो, म्हणजेच खांदे, छाती, कंबर हा भाग समान असतो. १९ टक्के महिलांच्या शरीराचा आकार यापेक्षा वेगळा असतो. वय वाढल्यानंतर महिलांच्या शरीराचा आकार समान म्हणजेच आयताकार होत जातो.

४) पुरूषांच्या स्तनाचा आकार का वाढतो?
पुरूषांच्या स्तनाचा आकार अनेक वेळा वाढतो, असं म्हटलं जातं की जास्त बिअर पिल्याने असं होतं, पण स्तनातील पेशी वाढल्याने असं होतं, लठ्ठ आणि वजनदार लोकांमध्ये वसा सारख्या फिमेल हार्मोन इस्ट्रोजन तयार होतो, यामुळे स्तन वाढतात.

५) कोणत्या पुरूषांमध्ये सेक्सची क्षमता जास्त?
तुर्कीच्या संशोधकांनी २०० पुरूषांवर सर्वे केला, यानंतर ज्याच्या शरीराचं बॉडी मास इंडेक्स जास्त असतं, अशी माणसं जास्त वेळ समागम करू शकतात, म्हणजे सरासरी ७.३ सेकंद, तर सळपातळ पुरूष दोन मिनिटचं टिकतात. फार जाड लोकांमध्ये सेक्सची क्षमता जास्त असेल, पण त्यांना सुरू करण्यास वेळ लागतो, मात्र अनेक वेळा जास्त जाड लोकांमध्ये सेक्स करण्याची क्षमताच लवकर संपते - (स्रोत- इंटरनॅशनल जर्नल ऑफ़ इंपोटेंस रिसर्च)

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.