OMG : बारीक होण्यासाठी ही युवती पाहा काय खाते

वजन कमी करण्यासाठी लोक काय काय करतात. मात्र ही युवती बारीक होण्यासाठी चक्क आपल्या डाएटमध्ये सकाळच्या वेळेस १५ केळी, दुपारी विविध प्रकारची ४० फळांचे तुकडे आणि डिनरमध्ये दोन किलो बटाटे खाते. 

Updated: Jan 17, 2016, 04:02 PM IST
OMG : बारीक होण्यासाठी ही युवती पाहा काय खाते title=

नवी दिल्ली : वजन कमी करण्यासाठी लोक काय काय करतात. मात्र ही युवती बारीक होण्यासाठी चक्क आपल्या डाएटमध्ये सकाळच्या वेळेस १५ केळी, दुपारी विविध प्रकारची ४० फळांचे तुकडे आणि डिनरमध्ये दोन किलो बटाटे खाते. 

ही दुसरी कोणी युवती नसून फ्रीली आहे जिचे यूट्यूबवर ४९२,७९४ आणि इन्स्टाग्रामवर ३२९,००० फोलोअर्स आहेत. गेल्या नऊ वर्षापांसून ती हा डाएट प्लान पाळते. ३५ वर्षीय फ्रीली ओव्हरवेट होते. त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती. तसेच तिला सतत थकवा जाणवत असे. यामुळे तिने न्यूट्रिशयनवर सर्च करण्यास सुरुवात केली आणि जेवणात पूर्ण रॉ फूडचा समावेश केला. 

सुरुवातीला तिने एक महिना केवळ केळी खाल्ली. त्यानंतर हळूहळू तिने आपले डाएट वाढवले आणि मोसमी फळे खाण्यास सुरुवात केली. मात्र केवळ ४० फळांचे तुकडे खाऊन तिचे पोट भरत नव्हते. यामुळे तिने डिनरमध्ये बटाटे भाजून तसेच विवइध स्टाईलने खाण्यास सुरुवात केली. वजन कमी करायचे असल्यास लोकांनी कमीत कमी तीस दिवस तर असं डाएट करावस असं फ्रीली म्हणते.