पोटातील गॅसपासून सुटका होण्यासाठी हे पाच उपाय

पोटात गॅस झाल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यावर उपाय करण्यासाठी लोक डॉक्टरांकडे जातात. मात्र, पोटात गॅस होऊ म्हणून घरच्या घरी करा पाच उपाय आणि गॅसपासून मुक्ती मिळवा.

Updated: Dec 4, 2015, 04:21 PM IST
पोटातील गॅसपासून सुटका होण्यासाठी हे पाच उपाय title=

नवी दिल्ली : पोटात गॅस झाल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यावर उपाय करण्यासाठी लोक डॉक्टरांकडे जातात. मात्र, पोटात गॅस होऊ म्हणून घरच्या घरी करा पाच उपाय आणि गॅसपासून मुक्ती मिळवा.

पोटातील गॅस दूर करण्यासाठी आपल्या आहारात मूग, चना, मटार, तूर, वाटाणा, बटाटा, सोयाबीन, तांदूळ, आणि एकदम तिखट मसाले युक्त पदार्थ घेऊ नयेत. मात्र, आपल्याला पचतील अशा पदार्थांचे सेवन करावे. यात भाज्या, खिचडी, रोटी, दूध, पालक टिंडा, आले, आवळा, भोपळा, दुधी, लिंबू आदींचा समावेश असावा.

फळांचा विचार केला तर सी व्हिटॅमिन युक्त फळांचा वापर केला पाहिजे. सफरचंदामध्ये अनेक पोषक घटक असतात. रिकाम्यापोटी एक सफरचंद खाणे चांगले. त्यामुळे आंबटपणा, बद्धकोष्ठता आणि पोटाच्या समस्येवर मात करता येते. तसेच नियमित सेवन केल्यास गॅस, अॅसिडिटी, भूक न लागण्याच्या समस्या दूर होतात. तसेच रोज सकाळी एक कप आले युक्त चहा पिणे चांगले. त्यामुळे पचन क्रिया चांगली होते. तर आल्याच्या रसात थोडी मध मिसळून घेतल्यास पोटाची समस्या दूर होते.

पुदीनात अॅन्टी इंफ्लामेंट्री आणि अॅन्टीसेफ्टिक गुण असतात. पोटात दुखत असेल तर पुदीनाचे सरबत करुन पिणे चांगले. त्यामुळे पोटाला आराम पडतो.

लिंबाचा रस घेणेही चांगले. पोटात गुडगुडत असेल तर रोज सकाळी लिंबूपाणी पिणे चांगले. त्यामुळे कपापासून सुटका होते.

पपई खाणेही चांगले. पपईमध्ये फायबरयुक्त मात्रा जास्त असतात. आपल्याला पचनाची समस्या असेल तर ही समस्या दूर करण्यासाठी पपई मदत करते. पपई खाल्याने ते पोटात औषधाचे काम करते.

कोथंबीर ही पोटातील गॅस कमी करते. त्याची भाजी किंवा कोशिंबीर करुन खाणे चांगले. तसेच कोथंबीरचा रस घेणे केव्हाही चांगले. त्यामुळे पोट दुखण्यापासून सुटका करते तसेच गॅस कमी करते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.