ब्लडप्रेशर नियंत्रणासाठी करा आवळा रसाचे सेवन

हल्ली लहानांपासून थोरामोठ्यांना ब्लडप्रेशरचा त्रास असतो. काहींना हाय बीपी तर काहींना लो बीपीचा त्रास असतो. बीपीवर कंट्रोल ठेवण्यासाठी डॉक्टरांकडून औषधे, गोळ्या घेतल्या जातात. मुख्य म्हणजे तुम्हाला बीपी कंट्रोलमध्ये ठेवायचा असेल तर न चुकता ही औषधे घेणे महत्त्वाचे असते. मात्र आवळ्याच्या रसाच्या सेवनाने तुम्ही बीपीवर कंट्रोल ठेवू शकता. 

Updated: Dec 4, 2015, 01:07 PM IST
ब्लडप्रेशर नियंत्रणासाठी करा आवळा रसाचे सेवन title=

मुंबई : हल्ली लहानांपासून थोरामोठ्यांना ब्लडप्रेशरचा त्रास असतो. काहींना हाय बीपी तर काहींना लो बीपीचा त्रास असतो. बीपीवर कंट्रोल ठेवण्यासाठी डॉक्टरांकडून औषधे, गोळ्या घेतल्या जातात. मुख्य म्हणजे तुम्हाला बीपी कंट्रोलमध्ये ठेवायचा असेल तर न चुकता ही औषधे घेणे महत्त्वाचे असते. मात्र आवळ्याच्या रसाच्या सेवनाने तुम्ही बीपीवर कंट्रोल ठेवू शकता. 

आवळ्यामध्ये 'व्हिटामीन सी'चे प्रमाण सर्वाधिक असते. याचा फायदा बीपी कंट्रोलमध्ये ठेवण्यास होतो. व्हिटामीन सी हे अँटिऑक्सिडंटस असल्याने आरोग्य सुधारण्यात मोठी मदत करतो. तसेच रक्तपेशींचे कार्यही सुरळीत राहण्यास याचा फायदा होतो. आवळ्यामुळे रक्तातील कोलेस्टेरोल प्रमाणात राहते. 

आवळ्याचा रस प्यायल्याने बीपीचा त्रास आटोक्यात राहतो. तसेच हार्ट अॅटॅकचा धोकाही कमी होतो. यासाठी चमचाभर आवळ्याच्या रसात मध मिसळून पिणे फायदेशीर असते. आवळ्यासोबत बीपी कंट्रोलसाठी केशरचाही फायदा होतो. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.