मुंबई : उन्हाळ्यात शरीराला अधिक पाण्याची गरज असते. तसेच यावेळी त्वचेतील ओलावा कायम राखण्यासाठी पाण्याचे योग्य प्रमाण शरीरात असणे गरजेचे असते. उन्हाळ्यात त्वचेला तजेला मिळवून देण्यासाठी या पाच पदार्थांचे सेवन करा.
कलिंगड - कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे उन्हाळ्यात अधिकाधिक कलिंगड खाणे चांगले.
काकडी - काकडीमध्ये शरीरासाठी आवश्यक व्हिटामिन्सचा भरणा असतो. यात ९५ टक्के पाणी असते ज्यामुळे शरीरातील टॉक्सिनस बाहेर पडण्यास मदत होते.
लिंबाचा ज्यूस - लिंबाचा ज्यूसमध्ये व्हिटामिन सी आणि पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसारखी खनिजे असतात. सकाळी उठून कोमट पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यायल्यास शरीरातील टॉक्सिनस बाहेर पडण्यास मदत होते.
ग्रीन टी - ग्रीन टी शरीरासाठी चांगली मानली जाते. त्यातही उन्हाळ्यात ग्रीन टीचे सेवन केल्यास धोकादायक यूव्ही किरणांपासून संरक्षण होण्यास मदत होते.
पुदिना - उन्हाळ्यात पुदिनाचे पाणीही शरीरासाठी लाभदायक असते. पुदिन्यामध्ये थंडावा हा गुणधर्म असतो. उन्हाळ्यात हे पाणी पिणे चांगले.