न्यू यॉर्क: नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार हिरव्या भाज्या खाल्ल्याने मोतीबिंदू टाळता येऊ शकतो.
बॉस्टनच्या ब्रिघम अॅण्ड वूमेन्स हॉस्पिटल अॅण्ड हार्वर्ड मेडीकल स्कूलच्या जे. एच. कांग आणि त्यांच्या साथीदारांनी हिरव्या पालेभाज्यांतून काढल्या गेलेल्या नायट्रेट आणि पीओजी यांच्या संबंधावर संशोधन केले. एकूण ३५ वर्षांपेक्षा जास्त काळ केल्या गेलेल्या संशोधनात त्यांनी ४१,०९४ पुरुष आणि ६३,८९३ महिलांवर याचा अभ्यास केला.
यात १,४८३ मोतीबिंदूंच्या केसेसचा अभ्यास केला गेला. त्यांच्यामते जास्त नायट्रेट आणि हिरव्या पालेभाज्या ज्यांच्या शरीरात जातात त्यांना मोतीबिंदू होण्याचा धोका २०-३०% कमी असतो.
या संशोधनाविषयीचा एक अहवाल 'ऑप्थेल्मोलॉजी' नावाच्या एका वैद्यकीय मासिकात प्रसिद्ध झाला आहे.