आपल्या पार्टनरला सकाळी झोपेतून कसे उठवाल?

मुंबई : एखाद्या रिलेशनशीपमध्ये फक्त महिलेनेच पुरुषाला खूश ठेवण्याचा प्रयत्न करावा असे काही नसते.

Updated: Jan 17, 2016, 06:42 PM IST
आपल्या पार्टनरला सकाळी झोपेतून कसे उठवाल? title=

मुंबई : एखाद्या रिलेशनशीपमध्ये फक्त महिलेनेच पुरुषाला खूश ठेवण्याचा प्रयत्न करावा असे काही नसते. त्यामुळे पुरुषांनीही आपल्या बायकोची काळजी घेणे महत्वाचे आहे.

आपल्या पत्नीला सकाळी उठवताना तुम्ही तिच्या आवडीचा नाश्ता करून तिला बेडवर नेऊन दिला तर तिला फार आनंद होऊ शकतो. नाश्त्यासोबतच बेड टी पण चांगला पर्याय ठरू शकतो.

सकाळची वेळ खूपच रोमँटीक असते. त्यामुळे एखादे हलके गाणे वाजवून पार्टनरला जागवण्याचाही एक उत्तम उपाय आहे. काही झाले तरी पार्टनर उठताना तिच्या/त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद असला पाहिजे.

पत्नीला उठवताना तिच्या कपाळावर एक हलकेसे चुंबन देणे पार्टनरला खूश करू शकते. यातून तुमचे प्रेम व्यक्त होते.

पार्टनरच्या कानात हळूच 'आय लव्ह यू' म्हणणेही पार्टनरचा मूड उत्साही करू शकते.