रिकाम्यापोटी हा ज्यूस घ्या...वजन झटपट कमी करा

हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला कामापुढे स्वत:ला पुरेसा वेळ देणं शक्य नसतं. खाण्याच्या वेळा न पाळणे, बाहेरचे अरबट-चरबट खाणे यामुळे लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढायला लागलीये. वजन वाढले की लोक जिममध्ये वर्कआऊट कऱण्यास सुरुवात करतात. निरनिराळे उपाय करतात. मात्र यामुळे वजन कमी होतेच असे नाही. 

Updated: Apr 29, 2016, 11:08 AM IST
रिकाम्यापोटी हा ज्यूस घ्या...वजन झटपट कमी करा title=

मुंबई : हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला कामापुढे स्वत:ला पुरेसा वेळ देणं शक्य नसतं. खाण्याच्या वेळा न पाळणे, बाहेरचे अरबट-चरबट खाणे यामुळे लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढायला लागलीये. वजन वाढले की लोक जिममध्ये वर्कआऊट कऱण्यास सुरुवात करतात. निरनिराळे उपाय करतात. मात्र यामुळे वजन कमी होतेच असे नाही. 

ज्यांना वजन कमी करायचे आहे त्याच्यासाठी असा एक ज्यूस आहे ज्यामुळे वजन लवकर कमी होईल. टोमॅटोपासून बनवण्यात आलेला हा ज्यूस प्यायल्यास तुमचे वजन पटापट कमी होईल. 

ज्यूस बनवण्यासाठी लागणारे साहित्य

पिकलेले दोन टोमॅटो
काळी मिरी पावडर
दोन चमचे मध

असा बनवा टोमॅटोचा ज्यूस

टोमॅटो मिक्सरमध्ये टाकून पेस्ट बनवा. यात थोडी काळी मिरी आणि मध टाकून चांगले मिसळा. रोज सकाळी रिकाम्या पोटी हा ज्यूस प्या. यामुळे वजन कमी होण्यास मोठा फायदा होईल.