नवी दिल्ली : शरीरात जर कोलेस्ट्रोलचे प्रमाण वाढल्यास हृदयशी संबंधीत अनेक विकार होऊ शकतात. कोलेस्ट्रोल वाढल्यास शरीरावर यांचा वाईट परिणाम होतो.
आहारमधून आपण जे पोषक पदार्थ घेतो त्यामधूनच शरीरात कोलेस्ट्रोल निर्माण होते. शरीरातील कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी तेलकट पदार्थ कमी खाल्ले पाहिजे.
शरीरातील कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी या गोष्टी फायदेशीर होऊ शकतात.
- डाळ
डाळ ही शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. शरीरातील खराब कोलेस्ट्रोल बाहेर काढण्याचे कार्य डाळीतील फायबर करते. डाळीमध्ये असलेले प्रोटीन, कार्बोहाइड्रेड, व्हिटामिन आणि खनिज तत्व असतात जे हृदय निरोगी राखण्यास मदत करतात. हरभरा, उडद, मूग या डाळीत कोलेस्ट्रोल कमी असतात.
-ओट्स
ओट्स ही शरीरातील खराब झालेल्या कोलेस्ट्रोला नियंत्रित ठेवते.
ओट्समध्ये फाइबर, प्रोटीन आणि शुगर असतात. यात जास्त प्रमाणात फाइबर असल्याने कोलेस्ट्रोल नियंत्रणात राहते आणि हद्यच्या मांसपेशी मजबूत होतात.
- चहा
नियमित चहा प्यायल्याने शरीरातील कोलेस्ट्रोल नियंत्रणात राहण्यास मदत होते. कोलेस्ट्रोला नियंत्रणात ठेवण्यासाठी ग्रीन टी आणि ब्लॅक टी घेतली पाहीजे. ग्रीन टीमध्ये एनटीओक्साइड असतात ते कोलेस्ट्रोल कमी करतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.