तासनतास कम्प्युटरवर काम केल्यानंतरही रहा फ्रेश

 कम्प्युटर आजच्या आयुष्याची एक गरज बनली आहे. ऑफीस असो वा घर विना कम्प्युटर आता बहुतांशी जण जगू शकत नाही. त्यामुळे कम्यूटरवर काम करताना थकवा आला तरी आपल्याला काम करावे लागते.

Updated: Aug 20, 2015, 02:48 PM IST
तासनतास कम्प्युटरवर काम केल्यानंतरही रहा फ्रेश title=

मुंबई :  कम्प्युटर आजच्या आयुष्याची एक गरज बनली आहे. ऑफीस असो वा घर विना कम्प्युटर आता बहुतांशी जण जगू शकत नाही. त्यामुळे कम्यूटरवर काम करताना थकवा आला तरी आपल्याला काम करावे लागते.

त्यामुळे हे जाणणे जरूरी आहे की कम्प्युटरवर काम करताना आपण कसे करावे, जेणे करून आपण १०० टक्के देऊ शकतो. तुम्हीही कम्प्युटरवर काम करताना थकत असाल आणि त्यामुळे तुम्ही कामात १०० टक्के देऊ शकत नसाल तर तुमच्यासाठी काही खास टिप्स... या टिप्समुळे तुम्ही तासनतास काम करूनही ताजेतवाणे राहू शकतात. 

- सर्वात महत्त्वाचे अनावश्यक कम्प्युटरचा वापर करून नका 
- कम्प्युटरवर काम करताना खुर्ची योग्य आकाराची आणि डिझाइनची असली पाहिजे. 
- खुर्चाला संपूर्ण पाठ टेकली पाहिजे. कंबर, पाठ आणि हातांना आधार मिळाला पाहिजे. 
- की- बोर्ड आणि माऊसला ९० अंशाच्या कोनात फोल्ड केलेल्या हातांच्या समोर असले पाहिजे. किबोर्ड जरा उतारावर असायला हवा. 
- तुमच्या मांड्या जमीनशी समांतर असायला हव्या. गरज पडल्यास पायांना फूट रेस्टचा आधार द्या.
- कम्युटरवर काम करताना लँड लाइन फोन मानेत पकडून काम करून नका. 
- बराच वेळ टेलीफोनवर बोलायचे असेल तर हेडफोनचा वापर करा. 
- काम करताना शरीर ढिल्ले सोडा आणि मन शांत ठेवा. 
- की-बोर्ड आणि माऊसचा वापर कमी करण्यासाठी व्हाइस रेक्निशन यंत्रणाचा वापर करा. 
- मॉनिटरचा ब्राइटनेस कमी ठेवा, त्यासाठी अॅन्टीग्लॅमर कोटिंग ग्लासचा वापर करा. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.