मेलबर्न : तिखट मिरची खाल्याने पोटातील आतड्यांवर परिणाम होतो आणि जास्त खाण्यापासून तुम्हांला दूर ठेवले जाते असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी एका अभ्यासात काढला आहे. हा इलाज लठ्ठपणा दूर करण्यासाठी एक नवा इलाज म्हणून समोर येऊ शकतो.
अॅडलेड विद्यापीठाच्या संशोधकांनी शोध लावला की अधिक चरबीयुक्त भोजन पोटातील जठराला खराब करतात. जठर पोट भरल्याचे संकेत देते. विद्यापीठाने जठर आणि पोट भरल्याच्या संकेत देण्यासंबधी एक परिक्षण करण्यात आले.
हा शोध निबंध लिहणाऱ्या लेखिका आणि अॅडलेड विद्यापीठाच्या चिकित्सा विभागाच्या वरिष्ठ शोध फेलो असोसिएट प्रोफेसर अमांडा पेज यांनी सांगितले की, पोट भरल्यावर फूगते, त्यामुळे पोटातील नसा जागृत होतात आणि पोट भरल्याच्या सूचना देतात. ही सूचना तिखट मिरची जठरात गेल्यास नसाद्वारे मिळू शकते.
तिखट मिरचीत आढळणारा कॅपसाइसिन मनुष्यातील अन्न खाण्याची क्षमता कमी करतो. तिखट मिरची खाल्ल्यानंतर पोटातील जठरात संकेत जातात आणि नसा फुगण्याची प्रक्रिया कमी होती. त्यामुळे शरिराला उशीराने पोट भरायला हवे याचे संकेत जातात. त्यामुळे चरबी वाढण्याचे प्रमाण कमी होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.