फेसबुक-व्हॉटसअपमुळे हरवतंय 'लव्ह लाईफ'

आज स्मार्टफोन आणि इंटरनेटचा जमाना आहे. पण, या टेक्नॉलॉजिचा कामापुरता वापर न करता बहुतेक लोक आपल्या दिवसातला बहुतेक वेळ फेसबुक आणि व्हॉटसअपवर व्यतीत करतात. पण, यामुळे अशा लोकांची 'लव्ह लाईफ' मात्र तीळ तीळ तुटताना दिसतेय.  

Updated: Jun 18, 2015, 09:23 PM IST
फेसबुक-व्हॉटसअपमुळे हरवतंय 'लव्ह लाईफ'  title=

नवी दिल्ली : आज स्मार्टफोन आणि इंटरनेटचा जमाना आहे. पण, या टेक्नॉलॉजिचा कामापुरता वापर न करता बहुतेक लोक आपल्या दिवसातला बहुतेक वेळ फेसबुक आणि व्हॉटसअपवर व्यतीत करतात. पण, यामुळे अशा लोकांची 'लव्ह लाईफ' मात्र तीळ तीळ तुटताना दिसतेय.  

रेल्वेत पाहा, बसमध्ये पाहा, रस्त्यावर पाहा, कॉलेजबाहेर पाहा किंवा ऑफिसमध्ये... बहुतेक लोक त्यांच्या स्मार्टफोनमध्ये डोकं खुपसून बसलेली आढळतील. ही सवय इतक्या तीव्रतेने आणि सहज जडलेली आढळते की ही गोष्टच खूप सहज वाटायला लागते.

पण, स्मार्टफोन आणि टॅबलेटवर ऑनलाईन असलेलं दांम्पत्य एकाच बेडरूममध्ये एकत्र असूनसुद्धा एकमेकांपासून दूर राहतात. या सवयीचा सरळ सरळ परिणाम त्यांच्या सेक्स लाईफवर पडतो. 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, महिला आणि पुरुषांची सध्या जास्तीत जास्त रुची फेसबुक आणि व्हॉटसअपवर असल्यानं ते 'सेक्स'मधील त्यांची रुची हरवत आहेत. 

कामधंद्यात असलेल्या लोकांमध्ये ही सवय मोठ्या प्रमाणावर आढळते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. वैवाहिक जीवन संपुष्टात येण्यासाठी ते 'हे' कारण खूप महत्त्वाचं मानत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.