या 6 गोष्टी खाऊन पोटाची चरबी करा कमी

पोटाच्या वाढलेल्या आकाराच्या समस्येमुळे अनेक जण हैराण असतात. त्यासाठी अनेक जण जिममध्ये तासंतास व्यायामही करतात

Updated: Mar 11, 2016, 09:47 PM IST
या 6 गोष्टी खाऊन पोटाची चरबी करा कमी title=

मुंबई: पोटाच्या वाढलेल्या आकाराच्या समस्येमुळे अनेक जण हैराण असतात. त्यासाठी अनेक जण जिममध्ये तासंतास व्यायामही करतात, तर काही जण महाग औषधं घेऊन फिट व्हायचा प्रयत्न करतात. 

पण ही औषधं वापरल्यामुळे अनेकदा याचे साईड इफेक्ट व्हायचाही धोका असतो. पण पोटाची चरबी कमी करण्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर केला तर पोटाचा घेर कमी होतो, तो ही कोणत्याही साईड इफेक्टशिवाय. 

लसूण

लसूण एक नॅचरल एँटी-बायोटिक आहे, तसंच लसणामुळे श्युगरही नियंत्रणात राहते. लसूण शरिरातल्या त्या हार्मोन्सना सक्रिय करतात जे फॅट्सना जमू देत नाही. 

ग्रीन टी

गेल्या काही वर्षांपासून ग्रीन टी मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाला आहे. ग्रीन टी मध्ये कॅटचिन्स असतं, ज्यामुळे पोटातली अतिरिक्त चरबी कमी होते. 

केळं

रोज फास्ट फूड खाल्ल्यामुळेही पोटाची चरबी वाढते. त्यामुळे तुम्हीही एक सारखं फास्ट फूड खात असाल तर आता केळं खायला सुरुवात करा. केळ्यामध्ये पोटॅशियम असल्यामुळे फास्ट फूडचं क्रेव्हिंग कमी होतं. ज्यामुळे वजन कमी करायला मदत होते. 

पुदीना

एक कप कोमट पाण्यामध्ये पुदिन्याची पानं आणि काही थेंब मध टाकून प्या. यामुळे पोटाची चरबी कमी व्हायला मदत होते. 

दालचिनी

तुम्हाला वजन कमी करायची जास्तच घाई झाली असेल तर दालचिनीचा वापर करा. सकाळी नाश्ता करायच्या आधी आणि रात्री झोपायच्या आधी एक कप पाण्यामध्ये एक चमचा दालचिनी पावडर टाका. हे पाणी रोज दोन वेळा प्यायल्यामुळे पोटाचा आकार कमी होईल. 

सफरचंद

सफरचंदामध्ये पोटॅशियम असतं ज्यामुळे बराच वेळ भूक लागत नाही आणि वजन कमी व्हायला मदत होते.