मुंबई: पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) एक असा डिसऑर्डर आहे, ज्यामुळं वंध्यत्व येतं. जर कोणतीही महिला अनियमित मासिक पाळी आणि मुरूमांमुळे त्रस्त असेल आणि तिचं वजन वाढत असेल तर ती पीसीओएस नावाच्या हार्मोनल इंम्बॅलेन्सनं ग्रस्त असेल. स्त्रीरोग आणि वंध्यत्व विशेषज्ञ डॉ. ऋषिकेश पाय सांगतात की, वंध्यत्व उत्पन्न करणारा पीसीओएस सामान्य आजार आहे, जो आजकाल अनेक भारतीय महिलांमध्ये आढळतो.
अनेक महिलांना या आजाराविषयी माहिती नसते. हा आजार मुरुमांपासून वजन वाढण्यापर्यंत आणि हार्मोन असंतुलनासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. तज्ज्ञांच्या मते यावर उपाय करण्यासाठी महिलांना हे लक्षण दिसताच आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि उपचार सुरू करावेत.
पीसीओएसचे लक्षणं-
- अनियमित मासिक पाळी
- लठ्ठपणा (पोट, मांड्यांमधील चर्बी वाढते)
- अतिरोमता (चेहरा आणि शरीरावर लव वाढतात)
- तेलकट त्वचा आणि मुरूम येतात
- केस पातळ होतात
- स्वभावात अचानक बदल
- स्तनांच्या वाढीत कमतरता येते
- त्वचा जाडी होते
पीसीओएसवर उपचार -
गर्भ धारणेसाठी महिलांचं ओव्हूलेशन म्हणजे अंडोत्सर्ग होणं गरजेचं आहे. मात्र या आजारामुळे ओव्हूलेशनमध्ये समस्या निर्माण होते. औषधोपचारांनी हे ठीक होऊ शकतं.
लॅप्रोस्कोपी (कीहोल सर्जरी)-
गर्भाशयात आणि ट्यूबच्या तपासणीसाठी ही सर्जरी केली जाते. यात अंडाशयावरील पिटिका विद्युतधार प्रवाहासह पातळ सुईच्या मदतीनं जाळून टाकतात. यामुळं हार्मोन असंतुलनात सुधारणा होते आणि त्यामुळं गर्भवती होण्यात मदत मिळते. मात्र ही सर्जरी योग्यपद्धतीनं होणं गरजेचं आहे नाही तर त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो.
- नैसर्गिक उपायांनी पीसीओएसशी लढू शकतो.
- महिलांनी फर्टिलिटी योग्य आहार घ्यावा
विशिष्ट पीसीओएस फर्टिलिटी डाएट खाल्यानं सर्वात चांगली बाब म्हणजे त्यामुळं आपला गर्भवती होण्याचा चान्स वाढतो.
- आपल्या दररोजच्या आहारात प्रोटीन-कार्बोहायड्रेट समान प्रमाणात मिळावं
योग्य प्रमाणात प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट खाल्ल्यानं आपलं इन्सुलिनचं प्रमाण योग्य राहतं आणि आपल्या प्रजनन क्षमतेत वाढ होते.
- आठवड्यातून पाच दिवस कमीतकमी ४० मिनीटं व्यायाम करावा
व्यायामामुळं पीसीओएसमध्ये मदत मिळते, इंसुलिन संवेदनशीलतेत सुधारणा होते आणि पचनक्रिया वाढते याचा परिणाम म्हणजे वाढलेलं वजन कमी करण्यात मदत मिळते. आपण एरोबिक्स आणि रेझिस्टंस व्यायाम करू शकता, दोन्ही उपयुक्त ठरतात.
- कॉफी पिणं सोडून द्यावं
लगेच परिणाम हवा असेल तर कॉफी पिणं सोडून द्यावं. कॉफी कमी घेणं किंवा बंद करावं. कॉफी कमी प्यायल्यानं एस्ट्रोजनच्या प्रमाणात कमी येते.
हे सर्व उपाय केल्यानं महिलांच्या प्रजनन क्षमतेत वाढ होऊन, स्वस्थ बाळाचा जन्म होऊ शकतो. पीसीओएसचं लक्षण दिसल्यानंतर हार्मोनचं संतुलन कायम ठेवणं, एस्ट्रोजनच्या प्रमाणासाठी योग्य पचनक्रिया वाढवणं आणि ओव्हूलेशन योग्यवेळी होणं गरजेचं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.