कामेच्छा कमी होण्याचं कारण मुलं जन्म नाही तर...

जर आपण विवाहित असाल आणि काळापूर्वीच तुमची कामेच्छा कमी होत असेल तर त्याचं कारण मुलांचा जन्म नाही. एका सर्व्हेक्षणानुसार, वैवाहिक आयुष्य सुरू झाल्यानंतर एका वर्षाच्या आता घरात भांडणं, वाद, टोमणे मारणं सुरू होतं. यामुळं जोडप्यांमधील संबंध कमी होतात. 

Updated: Oct 5, 2015, 11:37 AM IST
कामेच्छा कमी होण्याचं कारण मुलं जन्म नाही तर...  title=

लंडन: जर आपण विवाहित असाल आणि काळापूर्वीच तुमची कामेच्छा कमी होत असेल तर त्याचं कारण मुलांचा जन्म नाही. एका सर्व्हेक्षणानुसार, वैवाहिक आयुष्य सुरू झाल्यानंतर एका वर्षाच्या आता घरात भांडणं, वाद, टोमणे मारणं सुरू होतं. यामुळं जोडप्यांमधील संबंध कमी होतात. 

आणखी वाचा - सहा नैसर्गिक गोष्टी ज्या काम करतात, व्हायग्रा सारख्या

जोडप्यांनी एकमेकांसोबतचा संवाद, एकमेकांच्या इच्छआ समजून घेतल्या तर त्यांच्यातील नातं दृढ होतं. जर्मनीच्या म्यूनिखमध्ये असलेल्या लुडविग मॅक्समिलियन विश्वविद्यालयातील लेखिका क्लाउडिया स्किमिडबर्ग यांनी सांगितलं की, विवाहाच्या पहिल्या वर्षात लैंगिक समाधान मिळालं पण नंतर यात सतत घट होत गेली.

आणखी वाचा - सर्वेत उघड झाले अनेक सिक्रेट जे महिला-पुरूष ठेवतात लपवून

या सर्वेक्षणसाठी २५-४१ वयोगटातील जवळपास तीन हजार जोडप्यांचे अनुभव घेतले गेले. लेखिकेनुसार, मुलांचा जन्म या संबंधातील कमतरतेचं कारण नाहीय. हा अभ्यास आर्काइव्स ऑफ सेक्शुअल बिहेविअर या जर्नलमध्ये प्रकाशित झालाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.