नवी दिल्ली: ५४ वर्षीय विनोद गुप्ताचं वजन १२३ किलो होतं. त्यासोबतच त्यांना मधुमेह, डायस्लिपीमेडिया सारख्या आजारांनी धरलं. त्याचं बीएमआय सामान्य प्रमाणात नसून ते ३९.४ ने वाढलं.
मात्र त्यांनी आपला लठ्ठपणा कमी करण्याचा निर्णय घेतला आणि बॅरिएट्रिक सर्जरी केली. त्यानंतर मागील दोन वर्षांमध्ये त्यांचं वजन ८०च्या जवळपास असून ते आता स्वस्थ जीवन व्यतित करत आहेत.
डॉक्टरांचं म्हणणं आहे की, लठ्ठपणा अनेक आजारांचं मूळ कारण आहे. मधुमेहासाठी लठ्ठपणा मोठं संकट आहे. कारण त्याचा शरीरातील रक्तुप्रवाहावर मोठा परिणाम होतो. जेव्हा आपण पहिलेपासूनच मधुमेहग्रस्त असाल, तेव्हा ते वजन कमी करण्यासाठी खूप त्रास होऊ शकतो.
एका संशोधनानुसार मधुमेहाच्या ८० टक्के प्रकरणांमध्ये लठ्ठपणा हेच मुख्य कारण असतं. मागील दशकात जवळपास अब्जावधी लोकांना मधुमेह आणि लठ्ठपणानं ग्रासलेलं आहे. डॉक्टरचं म्हणणं आहे की, अनियंत्रित मधुमेहाचे अनेक अपाय आहेत जसं हृदयविकाराचा झटका, चक्कर, आंधळेपणा, आतडे खराब होणं, शरिरातील नसांना अपाय होण्यासारख्या व्याधी निर्माण होऊ शकतात. ज्यामुळं शरिरातील कोणतं अवयवही कापावं लागतं.
जर महिलेच्या कमरेचा आकार ३५ आणि पुरुषांच्या कमरेचा आकार ४० पेक्षा जास्त असेल आणि त्यांना गोड खाण्याची इच्छा असेल तर त्यांनी मधुमेहाची तपासणी करणं आवश्यक आहे. अशा प्रकरणात वंध्यत्व सामान्य बाब होते. अभ्यासात हे पुढं आलंय की, महिला आणि पुरुषांमध्ये वंध्यत्व येण्याच्या कारणात लठ्ठपणा आणि मधुमेह हे सुद्धा महत्त्वाचे कारणं आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.