व्यायाम न करता वजन कमी करण्याचे ३ सोपे उपाय

अनियमित लाईफस्टाईलमुळे वजन वाढणे ही एक समस्या झाली आहे, मात्र आपल्या जीवनशैलीत थोडा बदल केला आणि आपल्या लाईफस्टाईलवर लक्ष दिलं तर ही अडचणही सहज सुटू शकते.

Updated: Dec 29, 2015, 07:18 PM IST
व्यायाम न करता वजन कमी करण्याचे ३ सोपे उपाय title=

नवी दिल्ली : अनियमित लाईफस्टाईलमुळे वजन वाढणे ही एक समस्या झाली आहे, मात्र आपल्या जीवनशैलीत थोडा बदल केला आणि आपल्या लाईफस्टाईलवर लक्ष दिलं तर ही अडचणही सहज सुटू शकते.

शरीरातील कॅलरी बर्न करण्यासाठी NEAT चा वापर करा, नेटचा अर्थ आहे, नॉन एक्सरसाइज एक्टिविटी थर्मोजेनेसिस, म्हणजे आपण जी हालचाल करतो, त्याच्याशी ही टर्म जुळलेली आहे, एका शोधानुसार प्रत्येक अॅक्टीवीटीचा स्तर हा वेगवेगळा असतो, एका दिवसात नेटच्या माध्यमातून एक व्यक्ती २ हजार कॅलरी बर्न करू शकतो.

१) ऑफिसात कॅलरी बर्न करा, ऑफिसात दिवसभर बसून राहण्यापेक्षा जरा फिरून या, दिवसभर बसून राहिल्याने देखील वजन वाढतं, जर तुम्ही डेस्कचा जॉब करत असाल, तर १५ मिनिटाचा आराम म्हणून जरा फिरून या, तुम्ही लिफ्टच्या जागी पायऱ्यांचा वापर करा. 

२) जर रिलॅक्सवेळेत तुम्ही टीव्हीसमोर बसले असतील, तर अधूनमधून उठा जरा फिरा आणि आपल्या कॅलरीज बर्न करा, जर तुम्ही घरात झाडू मारला साफ सफाई केली, तर तुमच्या कॅलरीज आपोआप बर्न होतील आणि तुमचं वजन नक्की कमी होईल. 

३) मुलांसोबत खेळूनही तुम्ही आपली कॅलरी बर्न करू शकतात. चालताना थोडासा वेग वाढवा आणि तो कायम ठेवा, यात कॅलरीज मोठ्या प्रमाणात बर्न होतील.