दूध कसे, कधी प्यावे...हे आहेत काही नियम

अनेकांना दूध प्यायल्यावर त्रास होतो. आयुर्वेदानानुसार दूध पिण्याचेही काही नियम आहेत. 

Updated: Dec 25, 2015, 04:32 PM IST
दूध कसे, कधी प्यावे...हे आहेत काही नियम title=

नवी दिल्ली : अनेकांना दूध प्यायल्यावर त्रास होतो. आयुर्वेदानानुसार दूध पिण्याचेही काही नियम आहेत. हे नियम पाळल्यास दूध प्यायल्याने तुम्हाला त्रास होणार नाही. गायीचे दूध सर्वात पौष्टिक असते. भूक शांत कऱण्यासाठी दूध प्यायले जाते. तसेच वजन घटवण्यासाठीही दूध प्यायले जाते. तुमची पाचनशक्ती योग्य नसेल तर दूध पचत नाही. 

अनेक लोकांना दुधात साखर टाकून प्यायची सवय असते. रात्रीचे साखर न घालता दूध पिणे अधिक फायदेशीर असते. यात एक ते दोन चमचे तूप टाकल्यास अधिक फायदा होतो. 

आयुर्वेदानुसार ताजे आणि जैविक दूध पिणे शरीराला आवश्यक आणि चांगले असते. पाकिटबंद दूध पिण्यापेक्षा हे दूध पिणे चांगले. 

अनेकांना कच्चे थंड दूध पिणे आवडते. मात्र ते चांगले नाही. दुध गरम करुन प्यावे. 

ज्यांना दूध प्यायल्यावर पचत नाही ते दुधात एक चिमूट आलं, लवंग, वेलची, केशर, दालचिनी आणि जायफळ आदि मिक्स करुन घेऊ शकतात. 

अनेकदा काही कारणामुळे रात्रीचे जेवण होत नाही. त्यावेळी दुधात केशर आणि वेलची टाकून प्यावे. यामुळे झोपही चांगली येते आणि शरीराला उर्जा मिळते. 

कधीही खारट वस्तूंसह दूध घेऊ नका. क्रीम सूप अथवा चीज दूधासोबत खाऊ नका. दुधासोबत आंबट फळेही खाऊ नयेत.