मुंबई : जेव्हापासून स्मार्टफोन आले त्यानंतर त्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. खासकरुन लोकांमध्ये कोठेही सेल्फी काढण्याची सवय वाढली आहे. जर तुम्हालाही सेल्फी काढण्याची शौक आहे तर हे तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकतं.
अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशनने पुन्हा-पुन्हा सेल्फी काढण्याची सवयीला मेंटल डिसऑर्डर असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशनने हे एक मनोविकार असल्याचं म्हटलं आहे. सेल्फाइटिस असं हा विकाराला नाव देखील देण्यात आलं आहे.
सेल्फीची वाढती सवय खासकरुन जी तरुणांमध्ये पाहायला मिळते. ते पुढे जाऊन धोकादायक ठरु शकते. सायकॉलोजिस्ट सांगतात की, मेट्रो सिटीजमध्ये देखील सेल्फीचा विकार वाढला आहे. यामध्ये जवळपास ६० टक्के तरुणींचा समावेश आहे.