मुंबई : एखादं नातं जपणं म्हणजे तारेवरची कसरत असते... त्यातून हे नातं पती-पत्नीचं असलं तर आपल्या जोडीदारावर हक्क न गाजवता आणि गृहीत न धरता तरीही एकमेकांच्या प्रेमाच्या जाळ्यात गुरफटत जाणं थोडं कठिणच...
बऱ्याचशा छोट्या - छोट्याशा गोष्टी कारणीभूत ठरतात आणि हे नातं आपल्या हातून अलगद कधी निसटून जातं हे आपल्याला कळतदेखील नाही... याला कारण, आपला निष्काळजीपणा ठरू शकतो. आपल्या पार्टरनला आपण गृहीत तर धरत नाहीत ना... किंवा आपल्या नात्यात काहीतरी बिनसतंय का? हे समजणं आणि उमजणं अत्यंत महत्त्वाचं असतं... पाहुयात अशाच काही गोष्टी ज्यांत आपल्या नात्यांत काहीतरी बिनसल्याच्या खुणा स्पष्ट दिसून येतात.
अधिक वाचा - सेक्स पावर वाढवण्यासाठी करा १० गोष्टी
एकमेकांवरचा विश्वास नाहिसा होत जाणं
विश्वास हा एखाद्या नात्याचा पाया असतो. एकमेकांना फसवणं मग ते आर्थिकरित्या असो, मानसिकरित्या किंवा शारीरिक... फसवणूक उघड झाल्यानंतर तुमच्या नात्यावर त्याचा नक्कीच परिणाम होतो.
एकमेकांबद्दल आकर्षण
तज्ज्ञांच्या मते, एकमेकांबद्दलच शारीरिक आकर्षण पती-पत्नीच्या नात्यातील महत्त्वाचा भाग आहे. जर तुम्हाला तुमच्या पार्टनरबद्दल शारीरिक आणि मानसिक ओढ नसेल तर तुमचं नातं शेवटच्या टप्प्यावर आहे, असं समजा.
सतत अपमान आणि टीका
एखादी व्यक्ती परिपूर्ण असतेच असं नाही... अगदी तुम्हीही नाही... पण, तुमच्या मनात आपल्या पार्टनरबद्दल असलेल्या अनेक नकारार्थी गोष्टी तुम्ही सतत बोलून दाखवल्या आणि त्याबद्दल आपल्या पार्टनरचा सतत अपमान किंवा टीका त्याच्या जिव्हारी लागू शकते.
अधिक वाचा - चुंबन (Kissing) घेण्याबाबत तुम्हाला माहिती नसलेल्या १० गोष्टी
संवाद हरवणं
सगळ्या गोष्टी चुकत जाण्याची सुरुवात कुठून होत असेल तर संवाद हरवणं... तुमचा संवाद हरवला तर उरतो तो फक्त 'वाद'... मग, एकमेकांबद्दलचे गैरसमज वाढतच जातात... आणि नात्याचे धागेही हळूहळू तुटत जातात.
नात्याची पर्वा नसणं
तुमच्या मॅसेजला, कॉल्सना किंवा हाकांना समोरून अजिबातच प्रत्यूत्तर मिळालं नाही... तर त्याला तुमची किंवा तुमच्यात असलेल्या नात्याची अजिबात पर्वा नाही असं समजा....
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.