हेलसिंकी : अर्थात, तुम्हालाही गाणं गुणगुणनं आवडत असेलच... पण, या गाण्याच्या सवयीमुळे तुमच्या आरोग्यावरही चांगला परिणाम होतो, हे तुम्हाला ठाऊक आहे का?
गाणं गुणगुणल्यामुळे केवळ तुमचा मूड फ्रेश होत नाही तर यामुळे तुमची स्मरणशक्तीही टवटवीत राहते. फिनलँडच्या हेलसिंकी युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या एका शोधनंतर ही गोष्ट समोर आलीय. शोधकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, गीत - संगीत विशेषकरून गायनं डिमेंशिया रोगाच्या प्रारंभिक अवस्थेत फायदेशीर ठरतात.
अधिक वाचा - रात्री अंघोळ केल्याने होतात हे पाच फायदे
मानसिक रोग्यांनाही संगिताचा मोठा फायदा होतो. या शोधादरम्यान डिमेंशियाच्या ८९ रोग्यांचं निरीक्षण करण्यात आलं. वैज्ञानिकांनी या रोग्यांची काळजी घेणाऱ्यांना १० आठवड्यापर्यंत रुग्णांना संगीत शिकवण्यास सांगितलं. यावेळी, मानसिक रोगी अनेक गाणं शांतपणे ऐकू आणि गुणगुणूही शकले.
अधिक वाचा - पोटाची वाढलेली चरबी एका आठवड्यात करा कमी, दिसा सुंदर आणि सेक्सी!
यापूर्वी, संगीत हे स्मरणशक्तीसाठी लाभदायक ठरतं, हे सिद्ध झालंय. परंतु, या शोधामुळे गाणं गुणगुणनं आणि ऐकणं अल्जायमरसारख्या डिमेंशिया आजारांवर परिणामकारक ठरतात, हे सिद्ध झालंय.