मुंबई : हिवाळी मोसमात कोवळ्या उन्हात बसण्याचे खूप फायदे आहेत. कुडकुडत्या थंडीत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही कोवळ्या उन्हात जरूर बसायला पाहिजे. त्यामुळे तुमच्या शरिराला व्हिटॅमिन डी मिळते. यामुळे तुमची हाडे अधिक मजबूत होतात.
याशिवाय कोवळ्या उन्हात मोठ्या प्रमाणात आयर्न असते. शरीरातील कमी असणारे आयर्न भरून निघण्यास मदत करते. त्वचेचा संसर्ग, अशक्तपणा, थकवा, कॅन्सर, टीबी आदी विकारांना कमी आर्यन मुळे सामोरे जावे लागते. परंतु हे सगळे विकार कोवळ्या उन्हाने कमी होऊ शकतात.
सूर्याच्या कोवळ्या उन्हामुळे ह्दय देखील चांगले राहते. यासगळ्याबरोबरच उन्हात बसण्यापूर्वी तुम्ही आणखी काही गोष्टींची काळजी घेतली पाहीजे. ते म्हणजे जर तुम्हाला उन्हात बसून घाम आला तर जास्त वेळ तेथे थांबू नये. दुपारी शक्यतो उन्हात बसू नये, असे फ्रान्सच्या हार्ट डिसिस स्पेशलिस्ट मार्सेल पोगोलो यांनी म्हटले आहे.
काही वैज्ञानिकांनी असं देखील सांगितलं आहे, सूर्याची कोवळी किरणे तुम्हाला फक्त शरीराच्यावरूनच नाही तर आतून देखील चांगलं पोषकतत्व देतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.