नवऱ्याच्या या गोष्टी बायकोला अजिबात आवडत नाहीत

पत्नीला नेमक्या आपल्या वागण्या बोलण्यातलं काय आवडत नाही.

Updated: Jan 20, 2016, 05:21 PM IST
नवऱ्याच्या या गोष्टी बायकोला अजिबात आवडत नाहीत title=

मुंबई : पत्नीला नेमक्या आपल्या वागण्या बोलण्यातलं काय आवडत नाही. हे समजणं अनेकांसाठी कठीण असतं, काहीही करून पत्नी आपल्यालाच दोष देते, त्यामुळे आपलं नेमकं काय चुकतंय, हे पतीला कळत नाही. त्यामुळे हे जाणून घेणे महत्वाचं आहे, की स्त्रियांना नेमक्या पुरूषांच्या कसाचा राग येतो.

१) तू छान दिसत असली, तरी माझ्या आई एवढी नाही, असं वाक्य तुमच्या पत्नीचा मुड खराब करू शकते. त्यामुळे मनातलं सर्वच पत्नीसमोर बोलायचं नसतं हे तसं लक्षात ठेवा.

२) तुमच्या पत्नीच्या डोळ्यातला राग तुम्ही जेव्हा स्पष्ट पाहत असतात, तेव्हा खात्री करा तुम्ही तुमच्या मित्राच्या पत्नीचे कौतुक तर करत नाहीत ना, कारण अनेक महिलांना दुसऱ्या महिलेचं आपल्या जवळच्या पुरूषाने कौतुक केलं की राग येतो.

३) ऑफिसमधून आल्यानंतर तुमच्या बायकोची आवडती मालिका टीव्हीवर सुरू असेल, तर लगेच चॅनेल बदलू नका, मूड खराब होईल हे नक्की

४) आपलं सामान नीट नेटकं ठेवा, घरभर पसरू नका, ओला टॉवेल बिछान्यावर फेकणे, शर्टपॅन्ट सोफ्यावर टाकणे, याचा बायकांना राग येतो.

५) तुमची चूक असेल तर मान्य करा, इगोचं भूत मानेवरून खाली उतरवा, पतीने चूक कबुल केली की ते त्यांना लगेच आवडते.