नारळाच्या तेलाचे आहेत उत्तम १० फायदे

नारळाच्या तेलाचे आतापर्यंत आपण अनेक फायदे ऐकले असतील. पण आज आम्ही तुम्हाला नारळाच्या तेलाचे असे फायदे सांगणार आहोत जे तुम्ही कधी ऐकले नसतील.

Updated: Jan 20, 2016, 04:58 PM IST
नारळाच्या तेलाचे आहेत उत्तम १० फायदे title=

मुंबई : नारळाच्या तेलाचे आतापर्यंत आपण अनेक फायदे ऐकले असतील. पण आज आम्ही तुम्हाला नारळाच्या तेलाचे असे फायदे सांगणार आहोत जे तुम्ही कधी ऐकले नसतील.

१. नारळाच्या तेलाने सकाळी गुळण्या केल्याने तोंडातून दुर्गंध येत नाही. त्यानंतर पुन्हा मीठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात यामुळे दिवसभर फ्रेश वाटतं. या गोष्टी आधी डॉक्टरचा सल्ला घ्या.

२. नारळाच्या तेलाने मालिश केल्यास त्वचा ही चांगली राहते. शेंविग केल्यानंतर तेल लावल्याने त्वचा नरम राहते. 

३. तुमचे केस जर खूपच दाट असतील त्यावेळेस कंडीशनर म्हणून तेलाचा उत्तम फायदा होतो. 

४. तुम्ही जर कॉफी पिण्याचे शॉकीन असाल तर कॉफीमध्ये दूध ऐवजी तेल आणि मध टाका. रिकाम्या पोटी ते प्यायल्याने शरिराला खूप फायदा होतो.

५. चेहरा जर कोरडा पडला असेल तर चेहऱ्यावर तेल लावावे. त्यामुळे चेहऱ्याला फायदा होतो.

६. सेक्स दरम्यान लुब्रिकेंटच्या ऐवजी नारळाचे तेल वापरणे उत्तम आहे.

७. खाण्याच्या पदार्थांमध्ये नारळाच्या तेलाचा वापर करण्यास काही हरकत नाही. 

८. त्वचेवर मॉश्चराईजर ठिकवण्यासाठी नारळाच्या तेलाने मालिश केली पाहिजे.

९. कोणत्याही जागेवरून स्टीकर काढल्यानंतर त्याचा डाग राहून जातो. अशा वेळेस नारळाच्या तेलाच्या साह्याने ते डाग काढू शकता.

१०. नारळाच्या तेलामध्ये समुद्राचं मीठ किंवा अन्य एखादे तेलाचे काही थेंब टाकून बॉडी स्क्रब करू शकता.