डोळ्यांखालील डार्क सर्कल्स काढण्यासाठी फायदेशीर बेकिंग सोडा

मुंबई : डोळ्यांखाली काळी वर्तुळं येणं हे कोणत्याही महिलेला किंवा पुरुषाला आवडत नाही.

Updated: Mar 7, 2016, 01:27 PM IST
डोळ्यांखालील डार्क सर्कल्स काढण्यासाठी फायदेशीर बेकिंग सोडा title=

मुंबई : डोळ्यांखाली काळी वर्तुळं येणं हे कोणत्याही महिलेला किंवा पुरुषाला आवडत नाही. ही काळी वर्तुळं काढण्यासाठी आपण बाजारातील अनेक महागड्या उपायांचा अवलंब करतो. परंतु, असे काही सोपे आणि घरगुती उपाय असतात ज्यामुळे आपण यावर मात करू शकतो. यातील एक अत्यंत सोपा आणि स्वस्त उपाय म्हणजे बेकिंग सोड्याची पेस्ट. 

बाजारात मिळणारा बेकिंग सोडा आणा. एक चमचा बेकिंग सोडा एका वाटीत घेऊन त्यात पाणी घालून त्याची पेस्ट तयार करा. डोळ्यांखाली असलेल्या काळ्या वर्तुळांच्या जागी लावा. ही पेस्ट तुमच्या डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या. ही पेस्ट ५-१० मिनिटे ठेवा आणि नंतर एका मऊ फडक्याने ती काढून टाका. हा उपाय काही दिवस केल्यावर डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होतील.