मुंबई : दात शुभ्र असणे फार गरजेचे आहे. काही जण इतरांविषयी दाताच्या रंगावरून निष्कर्ष काढतात. म्हणून हे उपाय करा आणि पांढरे शुभ्र दात ठेवा.
१. जेवल्यानंतर अनेकदा दातांमध्ये अन्नकण अडकतात. मात्र हे अन्नकण पिनने, काडीने कधीही काढू नका. यामुळे दातांना इजा होऊ शकते. त्यामुळे असे उपाय करू नका.
२. मोसमी फळे किंवा कच्च्या भाज्यांचा आहारात समावेश करा. कारण, शरीराला पौष्टिक सत्व देण्यासोबतच ते दातही पांढरे करतात.
३. गरम खाणे खाल्ल्यावर लगेच थंड पाणी पिऊ नका. यामुळे जबड्यावर परिणाम होतो. काही वेळेस दात हलू लागतात.
४. दातांच्या मजबूतीसाठी आपल्या आहारात कॅल्शिअम आणि क जीवनसत्व असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा. संत्रे, मोसंबी यांसारखी फळे आणि आवळा, दही, पनीर, नारळ, मोड आलेली कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करा.
५. महिलांनी मासिक पाळीच्या काळात दातांची खास काळजी घेणे आवश्यक आहे. कारण या काळात होणाऱ्या हार्मोनल बदलांचा परिणाम दातांवरही होऊ शकतो.