घड्याळाच्या काट्यांशी खेळ... जीवाला घोर

घड्याळ्याच्या काट्यांशी खेळणं हे अगदी जीवावर बेतू शकतं, असा निष्कर्ष `युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरेडो इन डेन`नं एका प्रयोगातून काढलाय. या प्रयोगाचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे एका मूळ भारतीय वैज्ञानिकाच्या अध्यक्षतेखाली हा प्रयोग पार पडलाय.

Updated: Apr 8, 2014, 10:55 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क
घड्याळ्याच्या काट्यांशी खेळणं हे अगदी जीवावर बेतू शकतं, असा निष्कर्ष `युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरेडो इन डेन`नं एका प्रयोगातून काढलाय. या प्रयोगाचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे एका मूळ भारतीय वैज्ञानिकाच्या अध्यक्षतेखाली हा प्रयोग पार पडलाय.
घड्याळाच्या वेळा स्वत:च्या इच्छेप्रमाणे बदलणं हे हृद्यासाठी परिणामकारक ठरतं. त्यामुळे हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो, असं हृदयविकार तज्ज्ञ अमनीत संधू यांनी म्हटलंय. आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी त्यांनी सोमवारी, हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या रुग्णांच्या संख्येचाही दाखला दिलाय.
विशेषज्ञांच्या म्हणण्यानुसार, घड्याळ्याच्या काट्यांना मागे-पुढे केल्याने कामाची वेळ तसंच झोपण्याची वेळही बदलते. धावपळीच्या जीवनात याचे वाईट परिणाम हृदयावर होतात. याउलट, घड्याळाचे काटे योग्य वेळेनुसार फिरत असल्यास त्याचा आपल्या आरोग्यावर आणि जीवनावर सकारात्मक परिणाम होतो, असा दावा त्यांनी केलाय.
वैज्ञानिकांच्या अभ्यासाचा हा तपशील येत्या काळात `ओपेन हार्ट`मध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.