वॉशिंग्टन: हदयासंबंधी आजार असलेल्या रुग्णांना असं वाटतं की ते जितका जास्त व्यायाम करतील, तितकं त्यांच्या हृदयासाठी चांगलं असेलं. मात्र ज्यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे, अशांनी आपल्या क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करणं धोकादायक आहे.
संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार सात तर्क समोर आलेले आहेत. ज्यांना एकदा हृदयविकासचा झटका येवून गेलेला आहे. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्यानं यासाठी झाली, कारण ते आपल्या क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करतात.
संशोधकांनी शारीरिक दृष्ट्या सक्रिय आणि एक वेळा हृदयविकाराच्या झटक्याचा सामना केलेल्या 2400 रुग्णांचा अभ्यास केला. अमेरिकेत लॉरेंस बार्कले नॅशनल युनिव्हर्सिटीच्या जीवन विज्ञानच्या पाउल टी.विलियम्सनं सांगितलं की, अशा रुग्णांनी ज्यांनी प्रत्येक आठवड्याला 48 किलोमीटरहून कमी अंतरात रनिंग केलं किंवा त्यांनी फिरून 73 किलोमीटर अंतर कापलं, अशा लोकांच्या मृत्यूत 65 टक्के कमी आलेली दिसली.
मायो क्लिनिक प्रोसिडिंग्जमध्ये प्रकाशित रिपोर्टमध्ये विल्यियमनं सांगितलं की, आलेल्या निष्कर्षावरून हे स्पष्ट झालं, रनिंग किंवा फिरायला जाण्यानं फायदा हा केवळ एका स्टेजपर्यंतच मिळतो. दर आठवड्याला 48 किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक रनिंग करणाऱ्या रुग्णांनामध्ये धोका जास्त असतो. हृदयाचे आजार असणाऱ्या रुग्णांनी व्यायाम करण्यासाठी एक सीमा निश्चित केली पाहिजे. जर ती सीमा पार कराल तर तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.