नवी दिल्ली : माणसाला आपण नेहमी चिरतरुण रहावं असं वाटतं. पण जसजसं वय वाढत जातं वाढत्या वयाच्या खुणा शरीरावर दिसू लागतात. वाढत्या वयात आपण निरोगी तर नक्कीच राहू शकतो. मात्र त्वचेला तसेच चेहऱ्याला चिरतरुण कसे ठेवणार आहे. निरोगी जीवनशैली, अॅक्टिव्ह राहणं आणि पोषक आहार ही त्रिसूत्री अवलंबल्या तुम्ही नक्कीच निरोगी आणि चिरतरुण राहू शकता. त्यासाठी वेगळं किंवा स्पेशल असं काही करायला नको. घरातील हे पाच खाद्यपदार्थ तुमची त्वचा चिरतरुण आणि निरोगी ठेवण्यात मदत करतील. तर नक्की जाणून घ्या
ऑलिव्ह ऑईल - संशोधनानुसार ऑलिव्ह ऑईलमध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट आपलं हृद्य आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्याचं काम करतं. तसंच वयोमानाशी निगडित अनेक आजारांवरही आॉलिव्ह ऑईल उपयुक्त आहे.
दही - प्रत्येकाच्या घरात दही असतंच. मुलं तर आवडीनं खातात. दह्याच्या सेवनानं अनेक गुणकारी फायदे आपल्या शरीराला होतात. यामध्ये चांगले बॅक्टेरिया असल्याने शरीरास अत्यंत उपयोगी आहे.
रेड वाईन - रेड वाईनमध्ये असलेले युनिक अँटी-ऑक्सिडंटस हद्याशी संबंधित आजार, डायबेटिस आणि वयोमानाशी निगडित स्मृतिभ्रंश सारख्या आजारांशी लढण्यास मदत करते.
संत्रे - हिवाळ्याच्या मोसमात संत्री मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. व्हीटामिन 'सी' चा खजिना म्हणजे संत्रे. कोलॅजन निर्मितीसाठी संत्रे उपयुक्त आहे. तसंच संत्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्सही असतात.
बेरीज - स्ट्रॉबेरीज, रासबेरीज, ब्लूबेरीज, ब्लॅकबेरीज या सर्व प्रकारच्या बेरीस निरोगी आरोग्यासाठी चांगल्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणवर अँटि-ऑक्सिडंटस असतात. तसेच यातील व्हिटामिन 'सी' त्वचेसाठी गुणकारी आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.