मासिक पाळीच्या वेदनेत हे दहा उपाय ठरतील उपयोगी

Updated: Jul 13, 2016, 09:23 PM IST
मासिक पाळीच्या वेदनेत हे दहा उपाय ठरतील उपयोगी title=

मासिक पाळीचे दिवस कोणत्याही स्त्रीसाठी एखाद्या भीतीदायक स्वप्नासारखेच असतात. यादरम्यान पोटदुखी आणि थकवा तुम्हाला अंथरूण धरायला भाग पाडतात. यावेळी स्त्रीया शक्यतो वेदनेपासून सुटका मिळवण्यासाठी पेनकिलर घेतात. पण हे पेनकिलर घेण्यापेक्षा काही घरगुती उपाय तुम्हाला वेदनेपासून दूर ठेवतील.

पाळीच्या त्या दिवसात पोटाखालच्या भागात आणि कंबरेत दुखणं सामान्य बाब आहे. या वेदनेचं कारण प्रोस्टेग्लेंडाइन नावाचा हार्मोन आहे जो गर्भाशयाजवळून निघतो. हा हार्मोन प्रसुतीदरम्यानही सक्रिय असतो. यामुळे गर्भाशयाची लायनिंग बाहेर निघते. सोबतच गर्भाशयात रक्ताची कमतरता निर्माण होते ज्यामुळे स्नायुंमध्ये खुप वेदना होतात. पण मासिक पाळीच्या त्या दिवसातील वेदना या काही घरगुती उपायांनी दूर ठेवता येते.

हे आहेत ते घरगुती उपाय

1. रताळी खाल्ल्याने त्या दिवसांमधील वेदना कमी होतात. यातील अँटीस्पॅज्माडिक गुण वेदना सहन करण्यास लायक बनवतात.
2. पाळीच्या दिवसांमध्ये जॅस्मीन फ्लेवरचा चहा घेतल्याने शरीर आणि मन आनंदी राहते.
3. आपल्या नाश्त्यामध्ये एक ग्लास दुधाचा समावेश करा. यातील कॅल्शिअममुळे पोटदुखी कमी होते.
4. पाळीच्या दिवसात पपई खाल्याने होणारा प्रवाह नियंत्रीत होतो.
5.गाजर खाल्ल्याने डोळ्यांच्या समस्या कमी होतात. या दिवसात गाजराचे ज्यूस घेतल्याने आराम मिळतो.
6. कोरफड ज्यूस मधासोबत घेतल्याने या दिवसात होणाऱ्या वेदना कमी होतात आणि प्रवाहही नियंत्रीत राहतो.
7. पाळीच्या दिवसात मांस आणि कॅफीनपासून दूर राहा. यामुळे वेदना कमी होतील.
8. आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करा. त्यामुळे पोट आणि पाठीला आराम मिळतो.
9. आपल्या पोटावर लवेंडर ऑईल लावल्यामुळे पोटदुखी आणि स्नायुंवरील ताण कमी होतो.
10. या दिवसात शक्य तेवढा आराम करा. पुस्तके वाचा, संगीत ऐका. यामुळे आपल मन आनंदी राहील.

यासोबतच पाळीच्या काळात हलके व्यायामप्रकार करा. घट्ट कपडेही शक्यतो टाळा. मीठाचे सेवन कमी करा. यामुळे वेदना कमी होतील.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.