तणावापासून दूर राहायचंय तर ई-मेल बंद करा!

आपण खूप तणावाखाली आहोत, डोकं जड झालंय... असं तुम्हालाही वाटत असेल तर घरी आल्यानंतर सरळ सरळ ई-मेल बंद करून टाका... किंवा त्याचा कमीत कमी वापर करा... आणि बघा तुम्हाला आपलं मजेशीर आयुष्य परत मिळाल्यासारखं वाटेल.

Updated: Jan 6, 2016, 11:31 AM IST
तणावापासून दूर राहायचंय तर ई-मेल बंद करा! title=

लंडन : आपण खूप तणावाखाली आहोत, डोकं जड झालंय... असं तुम्हालाही वाटत असेल तर घरी आल्यानंतर सरळ सरळ ई-मेल बंद करून टाका... किंवा त्याचा कमीत कमी वापर करा... आणि बघा तुम्हाला आपलं मजेशीर आयुष्य परत मिळाल्यासारखं वाटेल.

एका नव्या शोधानुसार, ई-मेल हे संवाद साधण्याचं एक उत्कृष्ठ माध्यम बनलंय. पण, हाच ई-मेल हताशा आणि तणावाचा श्रोतही आहे. जवळपास २००० लोकांवर करण्यात आलेल्या एका सर्व्हेत ही गोष्ट समोर आलीय. फ्युचर वर्क सेंटरनं केलेल्या या सर्व्हेत, ज्या व्यक्तींना वारंवार ई-मेल मिळत राहतात ते सतत ई-मेलच्या दबावाखाली वावरण्याची शक्यता जास्त असते. 

याशिवाय, या अध्ययनात असंही म्हटलं गेलंय की रात्री आणि सकाळी ईमेल पाहताना उच्चदाब आणि तणावही या व्यक्तींमध्ये जाणवला. अर्थातच, तुम्ही स्वत:हा दबाव किती जाणवून घेता किंवा किती सहन करता, हे तुमच्या व्यक्तीमत्त्वावर अवलंबून आहे. 

या अध्ययनाचे मुख्य लेखक रिचर्ड मॅककिनन यांनी या शोधातून ई-मेल हे दुधारी शस्त्र म्हणून समोर आल्याचं म्हटलंय. कारण, ई-मेलचे अनेक फायदे असले तरी यामुळे, तणाव, ताण आणि दबावाची समस्या वाढीस लागते, असं म्हटलंय.  
 
ज्या लोकांनी ई-मेल हे खूप उपयोगी असल्याचं म्हटलं अशा जास्तीत जास्त व्यक्तींना उच्च दबावाचा त्रास जाणवत होता. 

सुविधाजनक असल्या कारणानं आपण आलल्याला तांत्रिक गोष्टींच्या माध्यमातून आपली भावनात्मक प्रतिक्रिया नियंत्रित करण्याची सवय घालून घेतलीय. परंतु, हीच सुविधा आपल्या आरोग्यासाठी मात्र घातक ठरत असल्याचं तज्ज्ञ सांगतात.