www.24taas.com, वॉशिंग्टन
मांसाहार म्हटलं की अनेकांच्या तोंडाला आपसूकच पाणी सुटत... मांसाहार करणारा वर्गही तसा फार मोठा आहे... पण आता जरा या गोष्टीकडेही लक्ष द्या. जर तुम्ही पूर्णपणे शाकाहारी असाल तर तुमच्यासाठी एक खूषखबर आहे.
नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार शाकाहारी जेवण जेवणारी लोकं ही मांसाहार करणार्यांपेक्षा जास्त जगतात असा निष्कर्ष समोर आला आहे. खासकरून जे पुरुष मांसाहार करत नाहीत ते इत्तरांपेक्षा अधिक काळ जगतात. शाकाहारी असलेले मांसाहार करणार्यांपेक्षा किमान सहा तर जास्तीत जास्त दहा वर्षे तरी जास्त जगत असल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
अॅकॅडमी ऑफ न्युट्रिशियन आणि डायबिटीज २०१२ तर्फे घेण्यात आलेल्या ‘फूड ऍण्ड न्यूट्रिशियन कॉन्फरन्समध्ये’ हा निष्कर्ष स्पष्ट करण्यात आला. या संशोधनासाठी ऍकॅडमीने अमेरिका आणि कॅनडातल्या ९६ हजार लोकांवर संशोधन केले.