'भूता'सोबत सेक्स केल्याचा २५ वर्षीय महिलेचा दावा!

एक २५ वर्षीय प्रेमात पडलीय... तीनं आपल्या प्रियकरासोबत काही जवळचे क्षणही व्यतीत केलेत... तुम्ही म्हणाल त्यात नवलं ते काय...? पण, तीचा प्रियकर म्हणजे एक १०० वर्षांपूर्वी मृत्यूमुखी पडलेला तरुण आहे, असं सांगितलं तर... 

Updated: Nov 14, 2015, 09:59 PM IST
'भूता'सोबत सेक्स केल्याचा २५ वर्षीय महिलेचा दावा! title=

नवी दिल्ली : एक २५ वर्षीय प्रेमात पडलीय... तीनं आपल्या प्रियकरासोबत काही जवळचे क्षणही व्यतीत केलेत... तुम्ही म्हणाल त्यात नवलं ते काय...? पण, तीचा प्रियकर म्हणजे एक १०० वर्षांपूर्वी मृत्यूमुखी पडलेला तरुण आहे, असं सांगितलं तर... 

होय, सीयाम जेम्सन या महिलेनं आपले एका भुताशी सेक्शुअल संबंध असल्याचा दावा केलाय... तो खूप चांगला दिसतो आणि तिची काळजीही घेतो, असं या महिलेचं म्हणणं आहे. आत्तापर्यंत घेतलेल्या अनुभवांपैंकी हा सर्वात सुखद अनुभव असल्याचंही ती सांगते.

अधिक वाचा - पान आणि कामजीवन

तिचा प्रियकर रॉबर्ट म्हणजे एक भूत आहे... तो १०० वर्षांपूर्वीच मरण पावलाय.... पण, तो आपल्याशी संवाद साधतो, शरीर संबंधही ठेवतो, असं या महिलेनं म्हटलंय. 

असा दावा करणारी सीयाम ही काही पहिलीच महिला नाही... यापूर्वीही अनेक महिलांनी भूतांनी आपल्याशी शारिरीक संबंध ठेवल्याचा दावा केलाय. 

विज्ञान काय म्हणतं?
खरं म्हणजे, सिनेमात भूताशी प्रेमप्रकरणं तुम्ही अनेकदा पाहिली असतील... पण, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, 'रॅपिड आय मुव्हमेंट स्लीप'मध्ये म्हणजेच एखादी व्यक्ती झोपलेल्या अवस्थेत असते तेव्हा त्यांच्या शरीराचे स्नायूही झोपलेल्या अवस्थेत असतात. परंतु, अनेकदा अशा व्यक्तींचा झोपलेला मेंदू मात्र अचानक जागा होतो... परंतु, स्नायू झोपलेलेच असतात. त्यामुळे त्यांना असे भास होतात. अशा वेळी तुम्हाला कुणीतरी स्पर्श करतंय किंवा तुमच्या छातीवर पहुडलंय असा भास होतो. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.