www.24taas.com, नवी दिल्ली
विकीलिक्सच्या आणखी एका धक्कादायक खुलाशाने भारतीय राजकारणात आणखी एक भूकंप झालाय. पंतप्रधान होण्यापूर्वी राजीव गांधी यांनी `साब-स्कॅनिया` या स्वीडीश कंपनीसाठी दलाली केल्याचा दावा विकिलिक्सनं वेबसाईटवर केलाय.
राजीव गांधी देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्रं स्वीकारण्यापूर्वी ते ‘इंडियन एअरलाईन्स’चे वैमानिक होते. आपली नोकरी सांभाळून ते स्वीडनमधल्या `साब स्कॅनिया` कंपनीचे एजंट म्हणूनही काम करत होते. ७० च्या दशकात भारताला फायटर जेट विक्री करण्याचा `साब स्कॅनिया` कंपनीचा हेतू होता त्यासाठी राजीव गांधीही सक्रिय होते, असा उल्लेख तेव्हा अमेरिकी दुतावासानं पाठवलेल्या केबलमध्ये करण्यात आला होता असा खुलासा विकिलिक्सनं केलाय. पण राजीव गांधींचा हा उद्देश साध्य होऊ शकला नाही, कारण हे कंत्राट साब-स्कॅनियाला मिळालं नव्हतं तर तर ब्रिटनच्या जग्वारला मिळालं होतं.
सोबतच, फायर ब्रँड नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी आणीबाणीच्या काळात भूमिगत राहून अमेरिकी गुप्तहेर एजन्सी ‘सीआयए’कडून आर्थिक मदत मागितली असल्याचा दावाही विकिलीक्सनं केलाय.