परदेशी मित्राने फेसबुकवर 1 कोटी रूपयांनी लुटलं

कोणताही नवा फेसबुक फ्रेंड तुम्हाला आर्थिक मदत देण्याचा दावा करत असेल तर सावधान, कारण तो तुम्हाला फसवू शकतो. देहरादूनच्या एका महिलेला चक्क 1 कोटी रूपयात फसवलं आहे.

Updated: Jul 22, 2014, 09:18 PM IST
परदेशी मित्राने फेसबुकवर 1 कोटी रूपयांनी लुटलं title=

देहरादून : कोणताही नवा फेसबुक फ्रेंड तुम्हाला आर्थिक मदत देण्याचा दावा करत असेल तर सावधान, कारण तो तुम्हाला फसवू शकतो. देहरादूनच्या एका महिलेला चक्क 1 कोटी रूपयात फसवलं आहे.

एका इंग्रजी दैनिकात आलेल्या बातमीनुसार आरोपीने देहरादूनमध्ये वृद्धाश्रम उघडण्यासाठी 9 कोटी रूपये देऊ केले. पण या आधी या रकमेचा टॅक्स देण्याची विनंती केली. 

राम विहारमध्ये राहाणाऱ्या बिना ठाकूर या इथेच फसल्या आणि त्यांनी आपल्या वेगवेगळ्या बॅक अकाऊंटमधून 1 कोटी 3 लाख रूपये आरोपीच्या खात्यावर जमा केले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.