दहावीच्या विद्यार्थिनीची वसतिगृहात प्रसूती

कंधमाल जिल्ह्यातील एका शाळेतील वसतिगृहात दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने मुलाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले आहे. 

PTI | Updated: Jan 28, 2015, 08:22 PM IST
दहावीच्या विद्यार्थिनीची वसतिगृहात प्रसूती     title=

बेरहमपूर : कंधमाल जिल्ह्यातील एका शाळेतील वसतिगृहात दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने मुलाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले आहे. 

गर्ल्स हायस्कूल आशालता पती या शाळेत दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गेल्या शुक्रवारी वसतीगृहामध्ये रात्री मुलाला जन्म दिला. याप्रकरणी शिक्षिका सस्मिता परिदा आणि नमिता प्रधान यांना निलंबित करण्यात आले आहे. 

कंधमाल जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एन. थिरुमला यांनी शाळेला भेट दिली. विद्यार्थिनीच्या प्रकृतीवरून शिक्षकांच्या लक्षात ही गोष्ट कशी आली नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरू आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.