close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

रेल्वे फाटकाच्या मागणीसाठी लहानग्याचं मोदींना पत्र

लखनौच्या जव्वळ उन्नावमधल्या राजेपूरमध्ये राहणा-या नयन सिन्हानं मोदींना एक पत्र पाठवलं. या पत्राची तात्काळ दखल घेण्यात आलीय. 

Updated: Feb 2, 2016, 03:18 PM IST
रेल्वे फाटकाच्या मागणीसाठी लहानग्याचं मोदींना पत्र

उन्नाव : लखनौच्या जव्वळ उन्नावमधल्या राजेपूरमध्ये राहणा-या नयन सिन्हानं मोदींना एक पत्र पाठवलं. या पत्राची तात्काळ दखल घेण्यात आलीय. 

हा नयन सातवी इयत्तेत शिकतो. रोज शाळेत जाण्यासाठी त्याला रेल्वे रुळ ओलांडावे लागतात. रुळ ओलांडणं अतिशय धोक्याचं आहे आणि त्यामुळे शाळेत जायलाही उशीर होतो. याचसंदर्भात अकरा वर्षाच्या नयननं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना गेल्या वर्षी पत्र लिहिलं. 

या पत्राची पंतप्रधान कार्यालयानं दखल घेतली आणि त्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश रेल्वे मंत्रालयाला देण्यात आलेत. त्यानंतर रेल्वेनं आता नयन सिन्हाला पत्र पाठवलंय.  राजेपूरमध्ये रेल्वे रुळांवर फाटक बसवण्याचं आश्वासन या पत्रात देण्यात आलंय. त्यासाठी रेल्वेच्या एका पथकानं संबंधित ठिकाणाची पाहणीही केली.