www.24taas.com, पीटीआय, नवी दिल्ली
९० रुपयांची चोरी केल्याच्या आरोपानंतर तब्बल १३ वर्षांपासून तुरुंगात असलेल्या एकाला हायकोर्टानं आज सोडलं. कदाचित चोरीप्रकरणी एका निर्दोष व्यक्तीला अटक केल्याचीही दिल्ली हायकोर्टानं व्यक्त केली.
दोन माणसांना लुबाडल्याच्या आरोपावरून खालिद कुरेशी याला २००१मध्ये सात वर्षांची शिक्षा झाली होती. त्याप्रकरणी कुरेशी यांनी हायकोर्टात धाव घेतली. त्यावर निकाल देताना कोर्टानं म्हटलं, की पोलिसांनी खरी वस्तुस्थिती समोर ठेवली नाही. तपास प्रक्रियेवेळी एकही स्वतंत्र साक्षीदार या प्रकरणात उपलब्ध झालेला नाही. खालिद कुरेशी याला घटना घडली त्या ठिकाणी पकडलेलं नाही. उलट घटना घडल्यानंतर एक ते दोन तासांनी तो तिथं आला, त्यामुळं चुकीच्या माणसाला चोर म्हणून पकडलं असण्याची शक्याता नाकारता येत नाही, असंही कोर्टानं म्हटलंय.
२० जानेवारी १९९९मध्ये कुरेशी यानं जितू चौधरी याच्या साथीनं पुरण सिंह आणि जगन्नाथ दाह यांच्याकडील ५० आणि ४० रुपये लुटल्याचा आरोप केला होता. यापैकी जितू चौधरीला न्यायालयानं मुक्त९ केलं. मात्र कुरेशी याला सात वर्षांची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेला कुरेशीनं हायकोर्टात आव्हान दिलं होतं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.