www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या दिल्ली पोलिसांविरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आंदोलन सुरू केलंय.
सागरपूर आणि मालवीय नगर या दोन पोलीस ठाण्यातल्या अधिकाऱ्यांसह २ एसीपींवर निलंबनाची कारवाई करावी यासाठी केजरीवाल सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्यालयाबाहेर धरणं धरणार होते. पोलिसांनी केजरीवाल यांना रेलभवन इथं अडवलंय. तिथंच धरणं देण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय.
दरम्यान, केजरीवाल य़ांच्या या आंदोलनामुळं दिल्लीकरांचे प्रचंड हाल होत आहेत. मध्य दिल्लीतली ४ मेट्रो स्टेशन्स सकाळी आठ वाजल्यापासून बंद आहेत. दरम्यान केजरीवाल यांच्या या पोलिसांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनामुळं नागरिकांमध्ये अत्यंत चुकीचा संदेश जातोय अशी टीका काँग्रेस नेते मीम अफझल यांनी केलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.