19 वर्षांच्या मुलीची उंची 78 सेंमी, वजन अवघं 10 किलो

वाचायला थोडं विचित्र वाटेल, पण बंगाल राज्यातील मीरापूर येथील कस्बे गावातील अजिफा शेख हीचं वय 19 असून तिची उंची फक्त 78 सेंटीमीटर तर वजन 10 किलोच आहे. ती आपल्या आईच्या खुशीत असते, तिला पाहिले तर ती दोन वर्षांची मुलगी वाटते. गल्फ न्यूजच्या बातमीनुसार, ती शाळेत ही जाते, लहान-लहान मुलांसोबत देखील खेळते.

Updated: Jun 17, 2014, 08:09 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था,पश्चिम बंगाल

वाचायला थोडं विचित्र वाटेल, पण बंगाल राज्यातील मीरापूर येथील कस्बे गावातील अजिफा शेख हीचं वय 19 असून तिची उंची फक्त 78 सेंटीमीटर तर वजन 10 किलोच आहे. ती आपल्या आईच्या खुशीत असते, तिला पाहिले तर ती दोन वर्षांची मुलगी वाटते. गल्फ न्यूजच्या बातमीनुसार, ती शाळेत ही जाते, लहान-लहान मुलांसोबत देखील खेळते.
अजिफाला एक वेगळाच आजार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिला असलेल्या आजाराचे आजूबाजूच्या डॉक्टरांना समजले नाही त्यापैकी एका डॉक्टराने कॅन्सर असल्याचे सांगितले. त्या कॅन्सरवर उपचार न करण्याचे तिच्या आई- वडिलांनी सांगितले. त्यानंतर त्यांच्या गावात एक डॉक्टर आला ज्याने संपूर्ण टेस्ट केल्या आणि तिला नेमका कोणता आजार आहे ते समजले. तेव्हा समजले की, लारोन सिंड्रोम हा आजार आहे त्याला अनुवांशिक आजार म्हणतात. हा आजार हार्मोनच्या संबंधित असल्याने तिचा विकास थांबला आहे, त्यामुळे आता जन्मभर तिची उंची तितकीच राहील.
अजिफाची आई अपिला आणि वडील शेख वोसेल यांना तिच्याबद्दल खूप वाईट वाटते. अजिफाचे छोटी भाऊ आणि बहिण तिच्यापेक्षा मोठे आणि समजूतदार झाले आहेत. मात्र तिची ना उंची वाढली ना बुद्धी वाढली.
लारोन सिंड्रोम हा आजार संपूर्ण जगात 300 लोकांना झाला आहे. परंतू याच्यावर काही उपाय नाही. ह्या आजारांने हाड कमजोर होतात.

अजिफाची संपूर्ण कुटूंब काळजी घेतात. तिचे लहान भावंडे ही तिच्याशी खेळतात. परंतू तिच्या आई-वडिलांना आशा आहे की कोणीतरी एक दिवस त्याच्या मदतीला येईल आणि त्यांची मुलगी ठिक होईल. त्यासाठी ते काही करायला तयार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.