जम्मू : जम्मू - काश्मीरमध्ये उरीच्या सेना मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय सेनेनं प्रत्युत्तरादाखल कारवाई करत 'लाईन ऑफ कंट्रोल' पार करत पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश केला. यावेळी, २० दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय.
'द क्विंट' या वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, १८ ते २० सैनिकांनच्या २ एलिट पारस युनिटसनं मिलेट्री हेलिकॉप्टर्सवर स्वार होत पाकिस्तान अधिकृत काश्मीरमध्ये तीन दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला.
सूत्रांच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांवर केलेल्या या हल्ल्यात जवळपास २०० हून अधिक जखमी झालेत. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानानं २० सप्टेंबर रोजी रात्री पाकव्याप्त काश्मीरला 'नो फ्लाय झोन' म्हणून जाहीर केलंय. 'पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स'नं एअर स्पेस बंदीमुळे अनेक उत्तर पाक शहरांत जाणाऱ्या फ्लाईटस् रद्द करण्यात आल्यात.