नवी दिल्ली : एक वेळा नोटबंदीचा झटका बसल्यानंतरही काळापैसा बाळगणारे धडा नाही घेत आहेत. बाजारात दिवसेंदिवस २००० रुपयांच्या नोटा गायब होत आहेत. आरबीआयने संकेत दिले आहेत की, जर पन्नास टक्के पेक्षा अधिक २००० च्या जुन्या नोटा बाजारातून गायब झाल्यानंतर पुन्हा एकदा झटका दिला जाऊ शकतो. असं पाऊल उचलतांना ताकीद केली जाईल की, सिस्टममधून गायब झालेल्या मोठ्या नोटा आता परत घेतल्या नाही जाणार.
नोटबंदीनंतर आतापर्यंत रिजर्व्ह बँककडून जारी केलेले रुपये आणि बंद झालेल्या जुन्या नोटांची माहिती सार्वजनिक नाही केली गेली आहे. नोटबंदी सारखा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनेक गोष्टींचा अभ्यास केला जाईल. पण कानपूरच्या रिजर्व्ह बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या आकड्यांमुळे खळबळ माजली आहे. कानपूरमध्ये नोव्हेंबर 2016 मध्ये 2000 रुपयांची नोट जारी केली गेली होती. तेव्हापासून आतापर्यंत कानपूरच्या सर्व करेंसी चेस्टला जवळपास 6,000 कोटी रुपयांचे दोन हजारांच्या नोटा देण्यात आल्या आहेत.
मार्चपर्यंत बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची स्थिती ठिक होती. पण बाजारात दोन हजार रुपयांच्या नोटा गायब होऊ लागल्या. यानंतर बँकेत १०, २०, ५० आणि १०० च्या नोटा अधिक जमा होऊ लागल्या आहेत. देशातील सर्व ठिकाणांची स्थिती पाहिल्यानंतर हे स्पष्ट होऊ शकणार आहे. त्यानंतरच कोणताही निर्णय घेतला जाणार आहे.