'एअर इंडिया' लटकलं... ३० ड्रीमलाइनर वैमानिकांचा राजीनामा!

'एअर इंडिया'च्या ३० ड्रीमलायनर वैमानिकांनी राजीनामा दिलाय. उल्लेखनीय म्हणजे, या वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी १५ करोड रुपये खर्च करण्यात आला होता. 

Updated: Sep 3, 2015, 02:27 PM IST
'एअर इंडिया' लटकलं... ३० ड्रीमलाइनर वैमानिकांचा राजीनामा! title=

नवी दिल्ली : 'एअर इंडिया'च्या ३० ड्रीमलायनर वैमानिकांनी राजीनामा दिलाय. उल्लेखनीय म्हणजे, या वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी १५ करोड रुपये खर्च करण्यात आला होता. 

'हिंदुस्तान टाईम्स'नं दिलेल्या वृत्तानुसार, ३० ज्येष्ठ बोईंग ७८७ ड्रीमलाइनर वैमानिकांनी एअर इंडियातून काढता पाय घेतलाय. ज्या वैमानिकांनी राजीनामा दिलाय ते सगळे सीनिअर को-पायलट आहेत. त्यांना जवळपास ४,००० तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे. या वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी तीन वर्षांपूर्वींच १५ करोड रुपये खर्च करण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सगळे पायलेट कोणत्याही सिक्युरिटी बॉन्ड किंवा कॉन्टॅक्टखाली आपली नोकरी न सोडण्यासाठी बांधिल नव्हते. त्यामुळे, नोकरी न सोडण्यासाठी ते स्वतंत्र आहेत.

या वैमानिकांना जेवढा अनुभव आहे त्यामुळे त्यांना कोणत्याही खाजगी एअरलाईन्समध्ये सहजच कॅप्टन पदावर नोकरी मिळू शकते.

या बोईंग ड्रीमलायनर वैमानिकांनी राजीनामा दिल्यानं एअर इंडियामध्ये मात्र एकच खळबळ उडालीय. एअर इंडियाच्या 'एचआर'समोर ही मोठी समस्या आहे. बोईंग विमानं चालवण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ लवकरात लवकर उभं कसं करणार? हे कोडं सध्या तरी सुटलेलं नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.