नोयडा : एक वर्षांपासून सोबत राहत असलेल्या एकाने युवतीला तब्बल ३२ वेळा भोसकल्याची तक्रार दाखल झाली आहे.जिम प्रशिक्षक असलेला वरुण गोयल हा एका युवतीसोबत वर्षांपासून राहत आहे. त्याच्याविरोधात तरूणीने तक्रार दिली आहे.दरम्यान, युवतीची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.
संबंधित युवतीने विवाह करण्यासाठी त्याच्याकडे मागणी सुरू केली होती. परंतु, वरुण विवाह करण्यास नकार देत होता. यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. वरूणने तिला अनेक वेळा भोसकले, आपल्याला ३२ वेळा भोसकल्याचं तरूणीने म्हटलं..घटनेनंतर वरूण पसार झाला आहे, ओरडण्याचा आवाज आल्यामुळे रात्री २ वाजता शेजारच्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेतील युवतीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याबाबत पुढील तपास सरू आहे.