देशात नोटांचा तुटवडा 4 ते 5 महिने जाणवणार?

बॅंकेत आता 500 आणि 1000च्या नोटा बदलून मिळणार नाहीत. मात्र तरीही बॅकेबाहेरच्या रांगा कमी झालेल्या नाहीत. एटीएममधील पैसे संपल्यामुळे बॅंकेत यावे लागत आहे. परंतु बँकेतीलही पैसे संपत असल्यामुळे नागरिकांना पैसे काढण्यावर मर्यादा येत आहेत. दरम्यान, आणखी 4 ते 5 महिने नोटांचा तुटवडा भासेल, अशी माहिती बॅंक फेडरेशनने दिली आहे. त्यामुळे देशात नोटांचा तुटवडा जाणवणार आहे.

Updated: Nov 26, 2016, 11:51 AM IST
देशात नोटांचा तुटवडा 4 ते 5 महिने जाणवणार? title=

नवी दिल्ली : बॅंकेत आता 500 आणि 1000च्या नोटा बदलून मिळणार नाहीत. मात्र तरीही बॅकेबाहेरच्या रांगा कमी झालेल्या नाहीत. एटीएममधील पैसे संपल्यामुळे बॅंकेत यावे लागत आहे. परंतु बँकेतीलही पैसे संपत असल्यामुळे नागरिकांना पैसे काढण्यावर मर्यादा येत आहेत. दरम्यान, आणखी 4 ते 5 महिने नोटांचा तुटवडा भासेल, अशी माहिती बॅंक फेडरेशनने दिली आहे. त्यामुळे देशात नोटांचा तुटवडा जाणवणार आहे.

नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशभरातील सर्वसामान्य जनता बॅंकेच्या रांगेत आहे. दरम्यान, आज शनिवार आणि रविवारी अशा दोन दिवस बॅंकांना सुटी असल्याने नागरिकांची एटीएमसमोर रांग दिसणार आहे. त्यातच काही एटीएममधील पैसे संपल्यामुळे करायचे काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

पुढील चार ते पाच महिने देशात नोटांचा तुटवडा जाणवेल, असे ‘द बॅंक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया’ने म्हटले आहे. देशातील चारही चलन निर्मिती केंद्रांनी पूर्ण क्षमेतेने नोटा तयार करण्याचे काम केले तरीही बॅंकांना आवश्यक तेवढे चलन नजीकच्या काळात उपलब्ध होणे अवघड आहे, असे या फेडरेशनने म्हटले आहे. यामुळे पैसे काढण्यासाठी बॅंकांमधील आणि एटीएममधील रांगा सध्यातरी कमी होण्याची शक्यता नाही.

मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली. बनावट नोटांना आळा घालण्यासाठी आणि काळ्या पैशावर नियंत्रण मिळवण्यासाठी जुन्या नोटा बाद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर अनेक खातेदार मोठ्या प्रमाणात पैसे काढण्यासाठी बॅंकांपुढे गर्दी केली. पण त्याचवेळी बॅंकांना आवश्यक चलन न मिळाल्याने गोंधळात जास्तच भर पडली.