केवळ ३० पैशांसाठी... साडे पाच महिन्यांची शिक्षा!

२६ वर्षांपूर्वी केवळ ३० पैशांवरून झालेल्या एका वादात एका व्यक्तीला न्यायालयानं पाच महिने आणि वीस दिवसांची शिक्षा सुनावलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 1, 2014, 10:06 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, रायपूर
२६ वर्षांपूर्वी केवळ ३० पैशांवरून झालेल्या एका वादात एका व्यक्तीला न्यायालयानं पाच महिने आणि वीस दिवसांची शिक्षा सुनावलीय.
हे घडलंय छत्तीसगडच्या आमानाका क्षेत्रात... पीडित सुरेश सिंह १३ फेब्रुवारी १९८७ रोजी राजकुमार कॉलेजजवळ आपला ट्रक दुरुस्त करण्यासाठी गेला होता. कामाच्या दरम्यान आपल्या दोन साथीदारांसह तो पान खाण्यासाठी बाजुलाच असलेल्या पानवाल्या प्रकाशकडे गेला. यावेळी त्याच्यासोबत अशोक सिंह आणि बब्बू होते.
पान खाल्ल्यानंतर त्यानं पाच रुपये दिले... त्यानंतर पानवाल्यानं त्याला उरलेले पैसे परत करताना ३० पैसे कमी दिले. सुरेशनं त्याच्याकडे पैसे मागितले तेव्हा पानवाल्यानं त्याला नंतर येऊन घेऊन जा असं सांगितलं. यावर या दोघांमध्ये वाद झाला. या वादाचं भांडणात पर्यावसण होत असतानातच पानवाल्याचे काही मित्र तिथं चाकू, काठी आणि रॉड घेऊन दाखल झाले. त्यांनी सुरेश आणि त्याच्यासोबत असणाऱ्या मित्रांना मारहाण सुरू केली.
यावेळी सुरेश चांगलाच जखमी झाला. त्यानं पोलिसांत याबाबत तक्रार केली. मंगळवारी आरोपी पानवाल्याला याची शिक्षा मिळालीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.