उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ६३ टक्के मतदान

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यासाठी विक्रमी मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यात ६३ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. पहिल्या टप्प्यात ८३९ उमेदवारांची भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद झाले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 11, 2017, 07:31 PM IST
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ६३ टक्के मतदान title=

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यासाठी विक्रमी मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यात ६३ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. पहिल्या टप्प्यात ८३९ उमेदवारांची भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद झाले आहे.

१५ जिल्ह्यातील ७३ मतदारसंघात विविध राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. राज्यात ११ फेब्रुवारी ते ८ मार्च या काळात सात टप्प्यात मतदान होणार आहे. 

दरम्यान, मतदानाच्या पार्श्वभूमीवर सहा हजार निमलष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळपास तीन वर्षांच्या कार्यकाळाची ही परीक्षा समजली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अच्छे दिन येणार का, याकडे लक्ष लागले आहे.