विद्वानांनी शोधून काढले ६ शतकातील रामायण

 विद्वानांनी कोलकतातील एका लायब्ररीत सहाव्या शतकातील हिंदू महाकाव्य रामायण शोधले असल्याचा दावा केला आहे. ही रामायणाची प्रत पांडुलिपी लिहिली गेली आहे. 

Updated: Dec 18, 2015, 09:13 PM IST
विद्वानांनी शोधून काढले ६ शतकातील रामायण  title=

कोलकता :  विद्वानांनी कोलकतातील एका लायब्ररीत सहाव्या शतकातील हिंदू महाकाव्य रामायण शोधले असल्याचा दावा केला आहे. ही रामायणाची प्रत पांडुलिपी लिहिली गेली आहे. 

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार पांडुलिपीतील रामायण कोलकता येथील संस्कृत साहित्य परिषदेच्या संस्कृत ग्रंथालयात सापडले आहे. रामायणाच्या आवृत्तीत राम आणि सीता हे मानव रुपात चित्रीत करण्यात आले आहेत. या रामायणातील बहुतांशी भाग हा राम आणि सीता यांच्या विहराचा उल्लेख आहे. 

दशरथ आणि रामाला वेगळे होण्याला या शोध लागलेल्या रामायणात महत्त्व दिले नाही. राम हे देव नसून एक मानव आहे. त्याला रागही येतो. तो अनेक वेळा अपयशीही झालेला आहे. खूप इंटरेस्टिंग गोष्टी यात नमूद करण्यात आल्या आहे. 

रामायणच्या या आवृत्तीत उल्लेख आह चौथ्या शतकातील रामायणापेक्षा वेगळे आहे. यात रामायणातील सात कांडांच्या ऐवजी पाच कांड आहेत. हिंदू समुदायात वाल्मिकी रामायणाला स्वीकृती सर्वाधिक आहे. 

हे विद्वान वन्हि पुराणावर काम करत होते. त्यावेळी त्यांना सहाव्या शतकातील रामायण सापडले. विद्वानांना वाटले की एशियाटिक सोसायटीच्या लायब्ररीतील वन्हि पुराणाची पांडुलिपी अपूर्ण आहे. त्यामुळे ते अपूर्ण पांडुलिपी शोधत असताना हा शोध लागला.