www.zee24taas.com, झी मीडिया, छत्तीसगड
छत्तीसगडमध्ये एक आगळीवेगळीचं घटना घडलीय... छत्तीसगडमधील केशकाळ भागात एका विचित्र बालकाचा जन्म झालाय. या बालकाच्या शरीराची रचना इतर बालकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे त्याला बघण्यासाठी हॉस्पीटलमध्ये प्रचंड गर्दी झालीय.
सातव्या महिन्यातच जन्म झालेल्या या मुलीचं संपूर्ण शरीर हिरव्या रंगाचं आहे. त्याच्या शरीराचा आकारही काहीसा कासवासारखा आहे... वेळेअगोदर जन्मलेल्या या बालकाच्या शरीराचा भाग पूर्णत: विकसित झालेला नाही. या बालकाचा चेहरा विकसित झालाय मात्र कान आणि डोक्याच्या मागचा भाग विकसित झालेला नाही. त्याचे डोळेही विकसित न झाल्यानं ते लाल रंगाचे दिसत आहेत.
तर, या बालकाच्या शरीराचा काही भाग प्रमाणापेक्षा जास्त विकसित झालाय. याबाळाला कुणी देवीचं रुप मानत आहेत तर कुणी दुसऱ्या ग्रहांवरुन आलेलं मानव (एलियन) म्हणत आहेत. मात्र, हे बालक देवही नाही आणि एलियनही... ते हरक्विलिन आजाराने पीडित आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिलीय.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अशी घटना लाखांत एक बघायला मिळते. हरक्विलिनने विशिष्ट विकृती शरीरावर दिसते. जर बालकाच्या पालकांनी रायपुरच्या मेडिकल कॉलेजमध्ये विशेषज्ज्ञांना या बाळाच्या आजाराच्या अभ्यासाची परवानगी दिली तर बालकाला झालेल्या आजाराचे निदान काढता येईल तसंच अशा इतर अनेक मुलांचे जीव त्यामुळे वाचू शकतील, अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.