नवी दिल्ली : आम आदमी पक्षांच्या नेत्यासमोरचे संकटं काही कमी होत नाहीयेत. तोमर यांच्या अटकेनंतर आता आमदार सोमनाथ भारती वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. भारती चार वर्षांपासून आपला छळ करत असल्याचा आरोप त्यांची पत्नी लिपिका मित्रा यांनी केलाय.
यासंदर्भात मित्रा यांनी महिला आयोगात सोमनाथ भारतींविरोधात तक्रार दाखल केली असून त्यांना आता नोटीस बजावण्यात आलीय.
सोमनाथ भारती आणि त्यांच्या पत्नीचे संबंध २०१० पासून बिघडले आहेत. आता आपली बाजू मांडण्यासाठी भारतींना २६ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
२०१०मध्ये सोमनाथ भारतींसोबत लिपिका मित्रा यांचं लग्न झालं होतं. पण लग्नानंतर एका वर्षातच आपल्याला मारहाण केली जात असल्याचा आरोप लिपिकांनी केला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.